महाराष्ट्र ट्रायबल न्युज

करंजुल ( क )आश्रम शाळा येथे निरोप समारंभ उत्साहात साजरा.

अलंगुण l प्रतिनिधी:- दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा करंजुल ( क )इ१० वी चा येथे निरोप समारंभ संपन्न झाला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री कामडी सर हे होते प्रथम प्रतिमेचे पूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले त्यानंतर गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला व इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी एक भिंतीवरचे घड्याळ व काही थोर नेत्यांची प्रतिमा शाळेला भेट दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून शाळेविषयी व गुरुजनाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्व विद्यार्थी भाऊक झाले होते काहींचे डोळे पाणावले होते ,शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले या वेळी श्री कामडी सर मुख्याध्यापक श्री एम एम सर श्री गावीत सर आर जी चौधरी सर वाघमारे सर एम जे सर आर के पवार ए जे भोये आर के भोये डी डी पालवा व अधीक्षक संगेवार सर उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी सरिता भगरे दिपाली गावित यांनी केले तर कौशल्य थोरात यांनी आभार मानले अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने