बा-हे प्रतिनिधी l नामदेव पाडवी :-सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिर्डी, धुरापाडा, धामणकुंड, सूर्यगड, भदर, अलंगुण, डोल्हारे, प्रतापगड, देवलदरी, बाफळुन, चिकाडी, मास्तेमान व तोरणडोंगरी तसेच शासकीय आश्रम शाळा डोल्हारे आणि करंजुल (सु) येथे IVDP FLN & STEM Learning Program अंतर्गत डिजिटल शिक्षण मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शैक्षणिक कृती सादर केल्या. Foundational Literacy & Numeracy (FLN) तसेच STEM आधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. वाचन कोपरा, तंत्रज्ञान कोपरा आणि उपक्रम कोपरा अशा विविध विभागांमधून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये प्रभावीपणे प्रदर्शित केली.
या कार्यक्रमास शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. LTI Mindtree Foundation व Pratham Infotech Foundation यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे डिजिटल उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद तसेच IVDP–PIF टीमचे विशेष योगदान लाभले.