महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*आर टी इ अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू - गट शिक्षण अधिकारी बी टी चव्हाण*

दिंडोरी l प्रतिनिधी:- RTE 25% admission process: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 12 (1) (C) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे संदर्भीय पत्रानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार १७-०२-२०२६ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भारता येईल याबाबत सर्व संबंधित शाळांनी नोंद घेऊन त्याबाबत कार्यवाही करावी तसे सदरची माहिती पालकांना पोहोचवण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आरटीई काय‌द्याअतंर्गत प्रवेश कुणाला ?

शिक्षणाचा अधिकार काय‌द्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतिही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य

आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य

बालकाचे जन्मप्रमाणपत्र आणि बालकाच्या पत्याचा पुरावा अनिवार्य

पालकांच्या राहण्याच्या पत्त्याबाबत दुय्यम निवासी दाखल्यांचा (सब रेशनकार्ड/पॅनकार्ड/लाइट

बिल) आवश्यक कागदपत्रे अनिवार्य

सामाजिक बंधन घटक (पालकांचा/बालकांचा जातीय दाखला व अपंगत्व प्रमाणपत्र अनिवार्य)

(परराज्यातील जातीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.)

अनाथ, दिव्यांग, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांना (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षातील

दाखला ग्राह्य असेल.)

आरटीईअंतर्गत किती जागांवर प्रवेश
शाळेचे नाव व संख्या

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल जउळके(14) 
किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल मानोरी (15)
निक्स इंग्लिश मीडियम स्कूल उमराळे बु(११)
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल वणी(१५)
संताजी इंग्लिश मीडियम स्कूल वणी(9)
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ढकांबे(44)
ग्लोबल पब्लिक स्कूल ढकांबे (९)
आदर्श इंटरनॅशनल स्कूल खेडगाव (15)
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी(१३)
अभिनव बाल विकास मंदिर दिंडोरी(१४)
बालभारती पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) दिंडोरी (२२)
निर्मिती इंटरनॅशनल स्कूल को-हाटे (२८)
अभिनव बाल विकास मंदिर निळवंडी. (५)
अभिनव बाल विकास मंदिर खेडगाव( 17)
 उषाताई देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल लखमापूर(१४)
अभिनव बाल विकास मंदिर करंजवण(१०)
कादवा इंग्लिश मीडियम स्कूल राजाराम नगर (4)
अभिनव बाल विकास मंदिर मोहाडी(12)
अभिनव बाल विकास मंदिर को-हाटे (04)
ऋषीलैंड उड्डाण इंग्लिश मीडियम स्कूल करंजी (4)
उत्कर्ष पॉलिक स्कूल ढकांबे (7)
 श्री ईशान्येश्वर इंग्लिश मीडियम स्कूल 
ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी 3
गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल दिंडोरी
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल दिंडोरी
बालभारती पब्लिक स्कूल (मराठी माध्यम) दिंडोरी 8,
अभिनव बाल विकास मंदिर वरखेडे 15,गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल उमराळे बु 8

एकूण ३६३ जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत असे गटशिक्षण अधिकारी बी टी चव्हाण यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने