महाराष्ट्र ट्रायबल न्युज

त्यागमूर्ती फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आंतरराज्यीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खोकरविहिर l प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यागमूर्ती फाउंडेशनच्या वतीने आंतरराज्यीय निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, बंधुता व एकात्मतेची जाणीव निर्माण करणे, विषमता व जातीभेद नष्ट करण्याचा संदेश देणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा परिचय नव्या पिढीला करून देणे हा होता.
    महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो शाळांनी व हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या लेखनातून शिवचरित्रातील आदर्श, स्वराज्याची संकल्पना आणि सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे उमटला.
     या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, शिक्षक, पालक व हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने