दिंडोरी l प्रतिनिधी:- ओझरखेड ,निगडोळ, अवनखेड, पाडे, वलखेड, येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे वरील गावांचे पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन व इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन मार्फत पाणी सुरक्षा नियोजन(WSP) या विषयावर प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न झाली यात प्रथम पाणी सुरक्षा नियोजना बाबत पाण्याचे महत्व, जल सुरक्षा योजना म्हणजे ?काय जल सुरक्षा योजना ही स्रोतांपासून घरापर्यंत सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचवलेली पद्धत आहे समस्या उद्भवल्या नंतर उपाय करण्याऐवजी संभाव्य धोक्यांची ओळख करून सुरुवातीपासूनच प्रतिबंध करण्यावर यात भर दिला जातो ग्रामीण भागात ही योजना पाणीपुरवठा सुधारण्यासाठी, तसेच आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीची पाणी व्यवस्थापन क्षमता मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि या योजनेमुळे पाणी पुरवठ्यातील धोके वेळेवर ओळखता येतात , तसेच जलसुरक्षा योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये असलेले धोके ओळखता येतात ,पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी कृती आराखडा तयार करता येतो ,ग्रामपंचायती ग्राम जल व स्वच्छता समिती(VWSC) यांना प्रशिक्षण देता येते तसेच स्वच्छता पाणी हाताळणी आणि वापर याबाबत जागरूकता वाढवता येते तसेच त्यामुळे गावात होणारे फायदे स्वच्छ पिण्याचे पाणी अतिसार ,कॉलरा, टायफाईड यांसारखे रोग कमी होतात तसेच आरोग्य सुधारणा विशेषतः व मुलांचे आरोग्य चांगले रहाणे पाणीपुरवठा टिकाऊ होणे नियमित तपासणी व देखभाल यामुळे पायाभूत सुविधा टिकून राहतात शासन व्यवस्था मजबूत होणे ग्रामपंचायती तसेच गावाचा व गावातील पाणी स्रोतांचा व संसाधनांचा सॅटेलाईट नकाशाच्या द्वारे गावातील पाण्याच्या स्रोतांचा व गावातील माहीती चा आढावा घेण्यात आला तसेच एका कार्ड खेळाद्वारे गावातील पाण्याबाबत चे संभाव्य धोके हे स्रोत, शुद्धीकरण, वितरण, आणि साठवणूक व वापरकर्ता या मुद्द्यांच्या आधारे धोके जाणून घेतले जसे की उंचावरील ठिकाणी पाण्याच्या कमी दाबामुळे पाणी पुरवठयामधे अडथळे निर्माण होतात, तसेच कलोरीन च्या प्रमाणातील कमी जास्त उद्भवणाऱ्या समस्या, तसेच ,उन्हाळ्यात अपुऱ्या पाण्याची समस्या, पाणी निर्जंतुकी करण ई. प्रशिक्षणाच्या वेळी प्रशिक्षणाच्या अगोदरची व नंतरची जलसुरक्षा नियोजनाची प्रश्नावली उपस्थित ग्रामस्थांकडून भरून घेण्यात आली या प्रशिक्षणातून ओझरखेड, निगडोळ ,अवनखेड, पाडे, वलखेड या गावांची पाणी सुरक्षा नियोजन संदर्भातील सखोल माहिती मिळाली ,व स्वच्छ व निरोगी पाणी लोकांपर्यंत पोहचवणे हा मुख्य उद्देश आहे .जल सुरक्षा नियोजनाच्या प्रशिक्षणा सोबतच पाणी नमुने तपासणी व गावातील जल सुरक्षा नियोजन च्या प्रशिक्षण ची पाणी सुरक्षा समिती व वाॅटर चॅम्पियन यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन या संकल्पनेवर मुख्यत्वे करून कार्य केले जाते ,तसेच यासाठी उपस्थित ग्रामस्थांकडून प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद मिळाला व प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन चे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर सर व प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी यांचे मार्गदर्शन मिळाले व टेक्निकल टीम साजन गुळवे व त्यांचा फिल्ड स्टाफ तृप्ती पाटील, भाग्यश्री सोमवंशी, ओम डोकफोडे, सुमेध मोरे, गायत्री चव्हाण यांनी प्रशिक्षण घेतले.
पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन व इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन मार्फत ओझरखेड, निगडोळ,अवनखेड, पाडे व वलखेड ई.गावात पाणी सुरक्षा नियोजन चे प्रशिक्षण संपन्न.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0