महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत एसटी प्रवास स्मार्ट कार्डचा शुभारंभ

दिंडोरी । प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडळाच्या प्रवास व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होत आहे. आता प्रवाशांना तिकीटाऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार आहे. रोख व्यवहार कमी करुन प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही योजना लागू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिंडोरी येथे एसटी प्रवास स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. या योजनेचा एसटी प्रवासांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी येथील पांडूरंग डिजिटल सेवा केंद्राचे संचालक पवन कस्तुरे, संचालिका आरती पवन कस्तूरे यांनी केले आहे. 
एसटी महामंडळाने पारंपारिक तिकीट पध्दतीला पर्याय देत एनसीएमसी प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डव्दारे प्रवाशांना सवलतींची अचूक नोंद, रोख्विरहीत व्यवहार आणि प्रतिपूर्तीची स्पष्ट प्रक्रिया एकाच माध्यमातून मिळणार आहे. विविध सामाजिक सवलती घेण्यासाठी भविष्यात हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. या स्मार्ट कार्डचा लाभ विविध प्रवासी गटांना देण्यारत येणार आहे. शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सील क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार संलग्न कार्ड दिले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी युडीआयडी क्रमांक जोहून विशेष सुविधा असलेले कार्ड उपलब्ध होणार आहे. त्यानुसार दिंडोरी आगारांमध्ये कार्ड नोंदणी मोहीम सुरु झाली आहे. दिंडोरी येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.तरी महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग (शारिरीक अपंग), विद्यार्थी, इतर सर्व सवलती, सवलत नसलेले प्रवाशींना या मोहीमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी येथील पांडूरंग डिजिटल सेवा केंद्राचे संचालक पवन कस्तुरे, संचालिका आरती पवन कस्तूरे यांनी केले आहे. याप्रसंगी वाहतुक नियंत्रण ललित सुर्यवंशी, भास्कर वडजे, बाबुराव अपसुंदे, चिंतामण भालेराव, दशरथ आधाट, यादवराव ढाकणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने