दिंडोरी । मनोज पाटील:- विद्यार्थ्यांनी परिक्षांची भिती बाळगु नये, परिक्षांचे योग्य नियोजन करावे. कोणत्याही क्षेत्रात तरबेज व्हावे, सर्वच क्षेत्रात यश मिळविण्यासाठी वाचनावर भर द्यावा’, असे प्रतिपादन दिंडोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी केले.
दिंडोरी येथील श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन, ज्युपिटर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये वार्षिक गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी सोपान राखोंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे होते. प्रमुख पाहुणे म्ेहणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विठ्ठलतात्या संधान, ज्येष्ठ नागरिक मधुकर गांगुर्डे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, सुजित मुरकुटे, हेमंत पगारे, माजी केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते बापूतात्या चव्हाण, शांताराम जाधव, खुशीराज आश्रमशाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती तोरवणे, भुषण बोरस्ते, प्रतीक मिठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राखोंडे पुढे म्हणाले की, श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन, ज्युपिटर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपल्याला समाधान वाटते असे ते म्हणाले. त्याचबरोबर पोलिस खात्यातील भरती, परिक्षा तसेच त्यासाठीची शैक्षणिक अर्हता याबद्दल विस्तुत माहिती सांगून पोलिस ते पोलिस महासंचालक पर्यंतच्या पदांबाबत सविस्तर माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे रांगोळी काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्याची प्रत्यक्ष पाहणी मान्यवरांनी करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विठ्ठलतात्या संधान, बापू चव्हाण, राजेंद्र गांगुर्डे यांनी कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कराटे प्रशिक्षणचे शिक्षक हनुमंत आहिरे यांनी विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी लावणी, कोळीगीत, हिंदी व मराठी लोकगीते, बहारदार नृत्ये सादर केली. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंती, नारळी पौर्णिमा, नवरात्र, जागरण गोंधळ, गोपाळकाला, देशभक्तीवर गीते, बालगीते, नाताळ गीत आदी गीतांवर वैयक्तिक व सामुहिक नृत्य सादर करुन पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षक भारावरुन केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाला राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षिका कल्याणी गांगुर्डे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रास्ताविक व सुत्रसंचालन शिक्षिका कल्याणी गांगुर्डे यांनी केले तर आभार शिक्षिका श्रतिका कराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका अंचल तिवारी, सोनाली जाधव, ज्योती गांगुर्डे, पुजा परदेशी, प्रचिती पितळे, खुशी केदारे, कृष्णा केदारे, अनुसया मानभाव आदींनी विशेष परिश्रम घेतले.