महाराष्ट्र ट्रायबल न्युज

विरमाळ, तोरणमाळ, आमडोंगरा जिल्हा परिषद प्राथ. शाळांना पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा

बा-हे l नामदेव पाडवी :- पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमडोंगरा, तोरणमाळ व विरमाळ या शाळांना ग्रीन केअर संस्था नाशिक यांचे तर्फे पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा करण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदरील पाण्याची टाकी उपलब्ध झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शाळेला एक भौतिक सुविधा उपलब्ध झालेली आहे. सदरील कामकाज हे ग्रीन केअर संस्थेच्या अध्यक्षा श्रीम.पौर्णिमाताई आठवले यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शाळा व गावासंबंधी इतर काही समस्या ही पूर्ण करण्याचे श्रीम.आठवले यांनी आश्वासित केले. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीम.पौर्णिमाताई आठवले (अध्यक्षा ग्रीन केअर संस्था नाशिक), सलीम शेख ( अध्यक्ष विनर ग्रुप नाशिक),कवी देवदत्त चौधरी, शिक्षक धर्मराज मोरे, सुरेश सूर्यवंशी, उपसरपंच संदीप चौधरी, यशवंत भुसारे,विश्वनाथ चौधरी, श्रीम.देशमुख मॅडम, हेमलता हाडस, शिक्षक नितीन गवळी, दामाजी धूम, श्याम धुम, सुभाष गवे,भास्कर धुम यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने