दिंडोरी l मनोज पाटील :-व्यवसाय करणाऱ्या बचत गटांचे कौतुक करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी बचत गटाचे माध्यम चांगले आहे. तसेच सहेली विकास महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शैलाताई उफाडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी केले.
दिंडोरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि.८ मार्च रोजी सहेली ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी गायत्री जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वणी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक गायत्री जाधव ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक आरोग्य सल्लागार जया खेडकर डॉ.सौ.वैशाली देशमुख,शिक्षण सल्लागार सौ.उज्वला कोथळे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या अध्यक्षा शैलाताई उफाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच
दिंडोरी तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला बचत गटांमध्ये सावित्रीबाई फुले महिला बचत गट (वरखेडा) नवनाथ महिला बचत गट (वनारवाडी) रुद्र महिला बचत गट (चाचडगाव) गर्जना महिला बचत गट (करंजवण) भिमाई महिला बचत गट (कोशिंबे) या लघुउद्योग व व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांच्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ.शिल्पा देशमुख उज्वला कोथळे,जया खेडकर,यांनी आपले मनोगत व्यक्त करून सहेली ग्रामीण विकास महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष शैलाताई उपाडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे तोंड भरून कौतुक केले.यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले यांनाही मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली ढिकले यांनी केले तर आभार शैलाताई उफाडे यांनी मानले.याप्रसंगी महिला बचत गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.