महाराष्ट्र ट्रायबल न्युज

“एक हात अनाथांसाठी” ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप

इगतपुरी l विक्रम वारूंगसे:- “एक हात अनाथांसाठी” ग्रुप, नाशिक यांच्या वतीने शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कथरूंगन, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
    यावेळी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, स्कूल बॅग, वॉटर बॉटल, मिठाई व लाडू यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या उपयोगासाठी भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास “एक हात अनाथांसाठी” ग्रुपचे श्री. सचिन विंचाळ, श्री. किरण पडवळ, श्री. प्रकाश जाधव, श्री. अजिंक्य बिरारी, श्री. जयवंत गायकवाड, श्री. गिरीश थुल, श्री. रमेश ओझा, श्री. अमोल सरोदे, श्री. जयराम गाडीलोहार, श्री. मनोज वाघ, श्री. मनोज माळी, श्री. अमोल घुगे, श्री. सुनील चोळके, श्री. रोशन विसपुते व श्री. शिरीष ठोंबरे हे सदस्य उपस्थित होते.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अलका जाधव, उपाध्यक्ष श्री. गोरख डिगे, अंगणवाडी सेविका सौ. मथुरा जाखेरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांसाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे, सामाजिक बांधिलकी जपावी, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
      सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल बावा सर व सहशिक्षक श्री. संजय चव्हाण सर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, “एक हात अनाथांसाठी” ग्रुपचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने