दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंडोरी येथील प्रतिथ यश व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुलकर्णी यांना यंदाचा दिंडोरी भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिंडोरी बाजार पटांगण येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात विवेक कुलकर्णी यांना दिंडोरी भूषण पुरस्कार माजी आमदार रामदास चारोस्कर,माजी आमदार धनराज महाले, नगराध्यक्ष आशा कराटे उपनगराध्यक्ष माधुरी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. विवेक कुलकर्णी यांनी दिंडोरी शहरासाठी मोठे योगदान दिले आहे.अनेक धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी सहभाग घेऊन मदत कार्य केले. आहे. अनेक गोरगरीब जनतेला ते सातत्याने मदत करत असतात. दिंडोरीच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.सामान्य कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांच्या ओळखी असल्याने त्यांना एक नेता म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल दिंडोरी नगरपंचायतीने घेतली असून त्यांना दिंडोरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला . विवेक कुलकर्णी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार,कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, चंद्रकांत राजे,शिवाजी पिंगळे,बंडूशेठ शिंदे, विलास नाना देशमुख, सोमनाथ सोनवणे, प्रमोद देशमुख,आदींनी अभिनंदन केले आहे.