महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे समाजदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिंडोरी l प्रतिनिधी:- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे समाजदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे प्रभाकर नाठे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वजास सलामी देऊन समाजगीत घेतले गेले. यानंतर म वि प्र संचालक प्रवीण जाधव,प्रांताधिकारी आपासाहेब शिंदे,डॉ दिलीप शिंदे,नगरसेवक सुजित मुरकुटे,अनिल देशमुख,प्रभाकर नाठे,मनोज ढिकले,सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघ,सतीश वाळके,संतोष पाटील,भाऊसाहेब पाटील,सूर्यकांत राजे ,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ यांनी करताना समाजदिन कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करताना कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा समाजदिन म्हणून साजरा केला जातो असेही त्यांनी नमूद केले.

                                                                                                                                              "बहुजन हिताय! बहुजन सुखाय" या ब्रीदवाक्यानुसार कर्मवीरांनी अत्यंत दूरदृष्टीने व कल्पकतेने समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी पुढाकार घेतला. कर्मवीरांनी १९१४ मध्ये उदाजी महाराज वस्तीगृहाच्या माध्यमातून मविप्रची मुहूर्तमेढ  रोवली. विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षणाचे ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्कार्य  केले. म्हणूनच समाज उभारणीत कर्मवीरांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन   डॉ डी बी शिंदे माजी प्राचार्य
यांनी केले.         यावेळी म वि प्र संचालक प्रवीण जाधव यांनी शिक्षण हे गरजेचे असून म्हणून कर्मवीरांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय याप्रमाणे समाज घडविण्याचा ध्यास घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचून समाजाचा उद्धार केला असे प्रतिपादन यावेळी केले .यावेळी   कर्मवीर रावसाहेब  थोरात यांच्या जन्मदिन समाजदिन साजरा केला जात आहे त्यानी कर्मवीरांच्या ऐतिहासिक पैलू याठिकाणी स्पष्ट केले.                  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी कर्मवीरांनी समाज सुधारणा व्हावी ,समाजाची प्रगती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन समाजाला शिक्षणाचे महत्त्व विशद करून समाज विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळे आज आपण आपल्या पायावर उभे आहोत  असे त्यांनी यावेळी म्हंटले.अध्यक्षीय भाषणात प्रभाकर नाठे यांनी आपल्या मनगटात ताकत असेल तर कोणत्याही परिस्थिती असो आपण त्याला सामोरे जाऊन यश संपादन करू शकतो . असेच कार्य आपल्या सर्व कर्मवीरांनी केले यामुळे आज आपण कर्मवीरांकडून प्रेरणा घेऊन समाज प्रगतिशील करण्याचा संकल्प करु आणि समाज गतिशील बनवू.

  विविध उपक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थी, क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठ स्तरावर विशेष नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या प्राध्यापकांचा, गुणवंतांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयात म वि प्र संचालक प्रवीण जाधव,प्रांताधिकारी आपासाहेब शिंदे,डॉ दिलीप शिंदे,नगरसेवक सुजित मुरकुटे,अनिल देशमुख,प्रभाकर नाठे,मनोज ढिकले,सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघ,सतीश वाळके,संतोष पाटील,भाऊसाहेब पाटील,सूर्यकांत राजे ,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ उपप्राचार्य आर आर झोमन, IQAC समन्वयक डॉ भगत,आणि महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोध्या संख्येने उपस्थित होते

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्रीमती सायली होळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती प्रतिक्षा गरुड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने