महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नाशिक जिल्ह्याचे जनसेवक खासदार श्री राजाभाऊ वाजे यांचे कट्टर समर्थक अंकुश राजे भोसले यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांना स्थानिक नेते म्हणून पालकमंत्री पद द्यावे यासाठी केली अपेक्षा व्यक्त

इगतपुरी l विक्रम वारूंगसे:- नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि विविधतेने नटलेला जिल्हा आहे. शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याला मोठी क्षमता आहे. मात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक प्रश्नांची जाण असलेले आणि जिल्ह्याच्या प्रत्येक भागाशी जोडलेले सक्षम नेतृत्व आवश्यक आहे.
   या पार्श्वभूमीवर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी पुढे येणे स्वाभाविक आहे.
    नाशिक जिल्ह्यातील माणिकराव कोकाटे (सिन्नर), नितीनभाऊ पवार (कळवण), दिलीपराव बनकर (निफाड), हिरामण खोसकर (इगतपुरी), सुहास कांदे (नांदगाव), डॉ. राहुल आहेर (चांदवड), दिलीप बोरसे (बागलाण), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सरोज अहिरे (देवळाली), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), राहुल ढिकले (नाशिक पूर्व), मुफ्ती मोहम्मद इस्माईल (मालेगाव मध्य) तसेच छगनराव भुजबळ (येवला), दादाजी भुसे (मालेगाव बाह्य) आणि नरहरी झिरवाळ (दिंडोरी) हे जिल्ह्याचे विधानसभा लोकप्रतिनिधी आहेत.
    या सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचत आहेत. मात्र जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघांना एकत्रितपणे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
    इगतपुरीच्या आदिवासी व ग्रामीण भागापासून ते नाशिक शहराच्या औद्योगिक आणि शहरी विकासापर्यंत, सिन्नरच्या औद्योगिक पट्ट्यापासून निफाड-येवला भागातील शेतीच्या प्रश्नांपर्यंत आणि कळवण-बागलाणच्या डोंगराळ भागापासून मालेगावच्या औद्योगिक क्षेत्रापर्यंत प्रत्येक भागाचा समतोल विकास होणे गरजेचे आहे.
    शेतकऱ्यांना सिंचन व पाण्याची उपलब्धता, युवकांना रोजगाराच्या संधी, औद्योगिक विकासाला चालना, ग्रामीण रस्ते व पायाभूत सुविधा, पर्यटनाचा विकास, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा आणि आदिवासी भागातील मूलभूत प्रश्न यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
    माणिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघाचे अनुभवी लोकप्रतिनिधी असून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आणि औद्योगिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे “नाशिक जिल्ह्याला स्थानिक प्रश्नांची जाण असलेला आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री मिळावा” या भावनेतून त्यांच्या नावाचा विचार व्हावा.
    ही मागणी कोणत्याही एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे नाशिकच्या विकासासाठी भूमिका मांडणे आवश्यक आहे.

नाशिकच्या विकासासाठी एकजूट, सक्षम नेतृत्व आणि ठोस निर्णय!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने