महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मनखेड आश्रमशाळेत भव्य-दिव्य पालक मेळावा उत्साहात संपन्न

अलंगुण l प्रतिनिधी:- दि. ०४/०९/२०२६ रोजी स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था, प्रतापगड संचलित, अनु. प्रा. माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, मनखेड येथे सन २०२६-२७ चा सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा भव्य पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी तब्बल ४०० पालक उपस्थित होते.
   आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आश्रमशाळेबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करणे आणि पालक-शिक्षक यांच्यात सुसंवाद घडवून आणणे हा या मेळाव्यामागचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची रूपरेषा :
१) प्रास्ताविक २) अध्यक्षीय निवड ३) अनुमोदन ४) प्रतिमा पूजन ५) ईशस्तवन / स्वागत गीत ६) सत्कार समारंभ ७) विद्यार्थी मनोगत ८) शिक्षक मनोगत ९) पालक मनोगत १०) अध्यक्ष मनोगत ११) आभार प्रदर्शन १२) समारोप १३) स्नेहभोजन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष *मा. श्री. प्रकाश राऊत* हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरेश कांमडी, श्री. लहानू राऊत, श्री. जयवंत वाघमारे, श्री. निवृत्ती पवार, श्री. सुरेश पवार, श्री. दिनेश महाले, सौ. मंजुळा ब्राह्मणे, सौ. चंद्रकला पवार आदी उपस्थित होते.
    प्राचार्य मणियार सर यांनी आश्रमशाळेचे ज्वलंत प्रश्न, समाज माध्यमात होणारे अपप्रचार आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. "आश्रमशाळा पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज झाली आहे. डिजिटल शिक्षण, सुरक्षित वसतिगृह, सकस आहार, ग्रंथालय, आरोग्य तपासणी याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान दिले जात आहे," असे त्यांनी सांगितले.
    माध्यमिक शिक्षक विजय पाटील यांनी पालकांची जबाबदारी व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती निर्मला भोये यांनी केले.
    विद्यार्थ्यांचे ठाम प्रतिपादन हे वैशिष्ट्य ठरले - शाळेचा मुख्यमंत्री रोशन चौधरी, उपमुख्यमंत्री मनिषा गांगोडे ,प्रियंका गायकवाड, चंदना वाघमारे, हर्षाली चौधरी, कीर्ती गवळी, चेतन वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. "आमची आश्रमशाळा सुंदर आहे, दिवसेंदिवस प्रगती करत आहे. येथे कोणताही गैरप्रकार घडत नाही. आम्ही सर्व गुरुजनांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. प्रत्येक पालकाने १५ दिवसांतून एकदा शाळेत येऊन प्रगती जाणून घ्यावी," अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली.
     पालकांच्या वतीने सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
    हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक मुख्याध्यापक *संजय पगार, अधीक्षक अरुण पवार,* पालक मेळावा कमिटी - *खैरनार सर, श्रीम. सुनिता वाघ, योगेश गोसावी, योगेश पवार, विनेश भामरे, अर्चना जाधव, चेतना पवार, मीना चव्हाण, वसंत आहेर दिनेश सहारे, भास्कर गांगुर्डे, पंकज थोरात, अनिल बागुल, रोहिदास गावित* इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांनी पालकमळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
    कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने