महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी उपनगराध्यक्षपदाची 19 रोजी निवडणूक


दिंडोरी । दिंडोरी नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवार दि. 19 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे दिंडोरी शहराचे लक्ष लागले आहे.
उपनगराध्यक्षा शैला उफाडे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दि. 19 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. 19 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान दिंडोरी मुख्याधिकारी संदीप चौधरी यंांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशन अर्ज कुणाला माघार घ्यायची असेल तर 15 मिनिटांत घेता येईल. त्यानंतर अंतीम उमेद्वारांचे नावे वाचून दाखविले जातील व निवडणूक प्रक्रिया त्याचवेळी घेण्यात येवून निकाल जाहीर करण्यात येईल. नगरपंचायत उपनगराध्यक्षपदासाठी अनेक उमेद्वार इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे गटागटाची मोर्चेबांधणी कशी होते व त्यानंतर कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडते, याकडे शहर व तालुक्याचे लक्ष लागले आहे. पीठासन अधिकारी म्हणून तहसिलदार मुकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने