महाराष्ट्र ट्रायबल न्युज

थोरात विद्यालयात यशवंतराव चव्हाण व ॲड बाबुराव ठाकरे यांना विनम्र अभिवादन.....


 ओझे l वार्ताहर
मविप्र साचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय व जुनिअर कॉलेज मोहाडी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड बाबुराव ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शरयू भामरे होत्या.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
 इयत्ता पाचवी ब च्या विद्यार्थिनी हरिशा जाधव व स्वरा जाधव यांनी यशवंतराव चव्हाण व कर्मवीर बापूराव ठाकरे यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शरयू भामरे यांनी देखील यशवंतराव चव्हाण व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन कलाशिक्षक कृष्णा जाधव धनंजय जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद बैरागी यांनी केले तर आभार राम ढगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने