महाराष्ट्र ट्रायबल न्युज

के.आर .टी .हायस्कूल वणी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण व कर्मवीर बाबुरावजी ठाकरे यांची जयंती साजरी

मुख्य संपादक l मनोज पाटील
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि कर्मवीर बाबुरावजी ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.कोतवाल एस. एन.‌ होते. महाराष्ट्राला पुरोगामीत्वाचा चेहरा देणारे अतिशय उदारमतवादी राजकीय विचारसरणी असणारे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी राजकीय क्षेत्रातून केलेले प्रयत्न आपल्याला कदापि विसरता येणार नाही .मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे संस्थेला मोठ्या प्रमाणावर दान स्वरूपात योगदान देणारे कर्तुत्व आणि दातृत्वाचा उत्तम संगम असलेले मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व सरचिटणीस बाबुरावजी ठाकरे यांचे संस्थे प्रतीचे योगदान आपल्याला कदापी विसरता येणार नाही.संस्थेच्या गुणात्मक विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत अमूल्य आहे . म्हणूनच त्यांच्या कार्याप्रती आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. असे आवाहन यावेळी अध्यक्ष स्थानावरून विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक कोतवाल एस. एन. यांनी केले .यावेळी अनेक विद्यार्थी व शिक्षक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक आर .डी. गायकवाड श्रीमती एम ए पोटिंदे श्री के जी गांगुर्डे एस डी चव्हाण एच आर चौधरी आर वाय पाटील वाय आर सावंत एन डी वायकंडे श्रीमती एस एस पवार आर एच निकम यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने