मुख्य संपादक l मनोज पाटील
आदिवासी बहुल तालुका असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पांडाणे टोलनाका टोलवसुली साठी सुरु करण्यात आला असुन या टोलच्या 25 किलोमीटर अंतरावर वास्तव्यास असणार्या वाहनचालकांना टोलमाफी देण्याची मागणी अंबानेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष रेहरे यांनी केली आहे.महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याना जोडणार्या वणी सापुतारा रस्त्यावरील पांडाणे टोलनाक्यावर वाहन चालकांकडुन टोल वसुलीस प्रारंभ करण्यात आला आहे.953 क्रमांकाचा असालेल्या या राष्ट्रीय महामार्गावर अनेक बाबींची पुर्तता प्रलंबित आहे.वणी पिंपळगाव रस्त्यावर डिव्हायडर नाही अनेक ठिकाणी साईडपट्यांचे आस्तित्व नाही तसेच रस्त्यालगत अपघातास आमंत्रण देणारे मानवनिर्मित अडथळे ठिकठिकाणी दिसुन येतात.
दरम्यान पांडाणे व परीसर हा आदिवासीबहुल भाग असुन या पंचक्रोशीत आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करतात नाशिकच्या बाजारसमीतीत प्रतिदीन भाजीपाला व गुजरात राज्यात टोमॕटौ,द्राक्ष स्ट्राॕबेरी व भाजीपाला शेतकरी उत्पादक वाहतुक करतात.मात्र हा टोल सुरु झाल्यानंतर शेतकरी वाहनचालकांना हा अतिरीक्त टोलचा भुर्दंड बसणार आहे.कारण रस्त्याचा दर्जा व पुर्तता याचा समन्वय व ताळमेळ बसविणे संबधित यांना हे आव्हानच आहे,अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असुन अपघातानंतर तातडीचे उपचार व वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणे व अपघातानंतर वाहतुक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत.तसेच टोल नाक्यावर स्थानिक यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी पुढे आली असुन सदर राष्ट्रीय महामार्गावर फलक बसविण्यात यावे तसेच माळै दुमाला फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे व ठिकठिकाणी पथदिपयाची पुर्तता करुनच टोलवसुली करावी व त्याबरोबर 25 किलोमीटर परीघाच्या अंतरातील वाहनचालक व शेतकरी यांच्या पिकअप व ट्रॕक्टर्स व वाहने यांना टोलमुक्ती देण्याची मागणी संतोष रेहरे यांनी केली आहे.