मुख्य संपादक l मनोज पाटील
दिंडोरी -दिंडोरी येथे श्री स्वामी समर्थ आँनलाईन सेवा केंद्राचे उदघाटन संचालक ॠषिकेश उत्तम खांदवे यांच्या आई-वडीलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्यनारायण प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.उत्तम बाबुराव खांदवे यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करण्यात आली.नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे, दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र गांगुर्डे, पत्रकार संदीप गुंजाळ, भुषण बोरस्ते, डॉ. विलास देशमुख आदींसह शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ आँनलाईन सेवा केंद्राच्या वतीने किसन कार्ड, टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर लायसन्स, आयुष्यमान कार्ड , पीएफची सर्व कामे, सातबारा डिजिटल सिटी सर्वे उतारे, उत्पन्न दाखला जातीचा दाखला, डोमासाईल, नॅशनॅलिटी, शॉप ॲक्ट लायसन, लाईटबिल भरणा,झेरॉक्स,लॅमिनेशन पॅन कार्ड , मतदान कार्ड , अर्जंट पासपोर्ट फोटो, तसेच माजी सैनिकांचे कामे केले जातील. अधिक माहितीसाठी संचालक ॠषिकेश उत्तम खांदवे मो. 8975114239 या संपर्क क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.