सप्तश्रृंगी गड- वार्ताहर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत बस असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर भारतीय स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँकांचे एटीएम कार्यरत आहेत मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे दोन्ही एटीएम केंद्र बंद असल्यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे एटीएम सेवा केंद्र असून अडचण नसून खोळंबा झाला असून रविवार मंगळवार शुक्रवार हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात तसेच यात्रा उत्सव काळात लाखो भाविक हजेरी लावत असतात एकीकडे शासनाकडून डिजिटल बँकिंग व्यवहार करा असे आवाहन करण्यात येते जवळ जास्त पैसे बाळगू नका त्यामुळे चोरी होण्याची शक्यता असते अथवा पैसे कुणाकडून हरवतात त्यामुळे ठिकठिकाणी शहरांमध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना त्वरित पैसे काढण्यात यावे यासाठी सप्तशृंगी गडावर दोन ठिकाणी एटीएम केंद्र उभारले गेले आहेत परंतु एकही एटीएम केंद्र चालू नसल्याने पैसे काढायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसाळताना दिसत आहे गेल्या दोन महिन्यांपासून एटीएम सेंटर बंद अवस्थेत असल्यामुळे एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत सप्तशृंगी गडावरील उपसरपंच संदीप बेनके यांनी सप्तशृंगी गडावर गेल्या आठ दिवसांपूर्वी सर्व शासकीय विभागांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी यांनी हा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर एटीएम केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली तसेच सप्तशृंगी निवासी ट्रस्ट कर्मचारी व रोपवे 700 ते 800 कर्मचारी यांचा दर महिन्याला पगार होता असतो दर महिन्याला हे कर्मचारी या एटीएम केंद्रामधून आपला पगार काढत असतात परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ही एटीएम केंद्र बंद असल्याने नांदुरी येथे दहा किलोमीटर जाऊन पैसे खर्च करत एटीएम केंद्रातून जाऊन पैसे काढावे लागत आहे त्यामुळे वेळही वाया जात आहे यात्रा उत्सव सुरू होण्याच्या आधी अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन एटीएम सेंटर सुरू करावे अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थ करीत आहे
चौकट
सप्तशृंगी गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आता डिजिटल व्यवहार झाल्यामुळे येणारे प्रत्येक भाविक एटीएम कार्ड वापरतात परंतु सप्तशृंगी गडावर आल्यानंतर एटीएम केंद्र बंद असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन कराव लागत आहे त्यामुळे भाविकांना नाईलाजाने येथील स्थानिक व्यापाऱ्यांकडून किंवा मी स्वतः जवळील पैसे पाहून द्यावे लागत आहे
सप्तशृंगी गड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके
चौकट
फनिक्यूलर ट्राॅली रोपवे येथे कार्यरत असून माझा पगार दर महिन्याला होत असतो परंतु येथील दोन्हीही एटीएम केंद्र गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे नाईलाजाने मला नांदूरी येथे दहा किलोमीटर एटीएम केंद्रावर जाऊन पगार काढावा लागतो
स्थानिक कर्मचारी सप्तशृंगगड
मनोज देशमुख