मुख्य संपादक: मनोज पाटील
किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत पिक कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी संगनमताने कट रचुन बनावट कागदपत्रे सादर करुन महाराष्ट्र ग्रामीण बँक दिंडोरी शाखेला 43 लाख 50 हजार रुपयांना गंडा घालणार्या 15 संशयीत यांचे विरोधात दिंडोरी पोलिसांनी शाखा व्यवस्थापकयांच्या फिर्यादीनुसार न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,सन 2014 ते सन 2016 या दरम्यानच्या कालावधीत किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत पिककर्ज घेतलेले थकित कर्जदार यांची वसुली बाबत वरीष्ठ कार्यालयाकडुन दिंडोरी शाखेचे शाखा व्यवस्थापक भालचंन्द्र देशपांडे यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा बँकेच्या कर्मचार्यांकडुन या संदर्भात माहीती घेतली असता थकित कर्जदार यांची फाईल दिली त्यात गौतम गोपाळ बस्ते रा.हातनोरे ,ता.दिंडोरी , पिक कर्ज 3 लाख ,शंकर बाळकृष्ण जाधव ,रा.पालखेड बंधारा ,ता.दिंडोरी पिक खर्ज 3 लाख ,हिराबाई बाळकृष्ण जाधव ,रा,पालखेड बंधारा ता.दिंडोरी पिक कर्ज 3 लाख ,पुंडलिक भगवंत बोरस्ते रा.हातनोरे ,ता.दिंडोरी पिककर्ज 3 लाख ,संदिप रघुनाथ जाधव रा.दिंडोरी पिक कर्ज 3 लाख ,प्रविण अंबादास जमधडे रा पिंगळे गल्ली ,मखामलाबाद ,नाशिक पिक कर्ज 3 लाख ,अंबादास खंडेराव जमधडे रा.पिंगळे गल्ली मखमलाबाद ,नाशिक ,पिककर्ज 3 लाख ,आरती मोहन पेलमहाले रा,पाडे ,ता,दिंडोरी पिककर्ज 3 लाख , पुजा नरेन्द्र पेलमहाले रा पाडे ,ता.दिंडोरी पिक कर्ज 3 लाख ,प्रमिला सुभाष पेलमहाले रा,पाडे ,ता.दिंडोरी ,पिककर्ज 2 लाख , 50 हजार , सिंधुबाई महादु नाठे रा.पाडे ,ता,दिंडोरी पिककर्ज 3 लाख ,गायत्री कृष्णा पवार रा.जालखेड ,ता.दिंडोरी पिककर्ज 2 लाख 50 हजार ,योगेश भिका पिंगळ रा.अवनखेड ,ता.दिंडोरी पिककर्ज 3 लाख , पोपट शिवाजी बोरस्ते रा.हातनोरे ,ता:- दिंडोरी , पिक कर्ज 3 लाख , युवराज भिका सहाळे रा,कादावा म्हाळुंगी ,ता.दिंडोरी पिककर्ज 2 लाख 50 हजार अशा 15 संशयीत यांनी 2014 ते 2016 या कालावधीत एकुण रक्कम 43 लाख 50 हजार रुपये इतके कर्ज घेतले.
कर्ज घेतल्या पासुन एकदाही कर्ज नुतनीकरण केले नाही सन 2017 मधे बँकेचे आॕडीट झाले तेव्हा आॕडीट करणारे अधिकारी यांच्या नजरेस या प्रकरणातील संशयास्पद बाबी नजरेस पडल्या. सदर 15 खातेदार यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन पिक कर्ज घेतले आहे तसेच काही कर्जदार यांचे नावाने क्षेत्रकमी असताना पडताळणी अंती यात बनावटीकरण करण्यात आल्याचे तलाठी यांचे अहवालावरुन स्पष्ट झाले, बनावट उतारे व शिक्के सादर करुन बँकेची फसवणुक करण्यात आल्याचे दिसुन आले. 12/3/2025 रोजी या सर्व नमुद खातेदारांच्या रकमेचा एकत्रीत आकडा हा 1कोटी 1लाख 2 हजार 384 इतका असल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. बनावट कागदपत्रे ,खोटे प्रतिज्ञापत्र ,खोटे डिक्लेरेशन सादर करुन नियोजनबद्ध पद्धतीने कट रचुन बँकेची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास दिंडोरी पोलिस करत आहेत.