मुख्य संपादक: मनोज पाटील
दिंडोरी तालुक्यात कृषी विभागात चांगल्या कामगिरी केलेल्या कृषी सहाय्यक रेणूका सातपुते यांचा कृषी विभागाने दखल सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेवून त्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनाकडून त्यांच्या कामगिरीविषयी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्या नाही. त्यांच्या कामाची दखल कृषी विभागाने घेतली. दिंडोरी येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये कृषी सहाय्यिका रेणूका सातपुते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार विभागीय कृषी सहसंचालक काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी डमाळे, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब भोये, मंडळ कृषी अधिकारी गोल्हाईत, सावंत, कृषी पर्यवेक्षक शामकांत पाटील आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेणूका सातपुते यांच्या कामगिरीबद्दल निळवंडी, मडकीजांब, जांबुटके, उमराळे, वनारवाडी, पाडे, हातनोरे व परिसरातील शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.