मुख्य संपादक: मनोज पाटील
प्रत्येक क्षेत्रात महिला या मोठ्या संख्येने आपलं अस्तित्व कर्तुत्व आणि नेतृत्व सिद्ध करीत आहे. कोणतेच क्षेत्र असे म्हणतातनाही की जिथे महिलांनी आपले स्वतःचे कर्तुत्व दाखवलेले नाही. नारीशक्तीचा गौरव हा स्त्री पुरुष समानतेचा एक भाग आहे म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी महिलांना समर्थपणे साथ देत त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी देऊ या, असे आवाहन दिंडोरी नगरपंचायतीच्या मा. उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माता हौशाबाई पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे झालेल्या महिला सत्कार सोहळ्यात जिल्हा परिषद वणी मुली व चौसाळे केंद्रातील 51 कर्तृत्ववान महिला शिक्षिकांचा सन्मान केला.त्याप्रसंगी शैलाताई उफाडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कृषिभूषण पुरस्कार विजेते तुकाराम बोराडे होते. माजी जिल्हा सदस्य व उपसरपंच विलास कड, माजी पंचायत समिती सदस्या वर्षा बर्डे, दिंडोरी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शैला उफाडे, आदर्श शिक्षक दादासाहेब पठाडे, सोपान बोराडे, सुलोचना पवार, सीमा मोरे आदी उपस्थित होते.
दिंडोरी नगरपंचायतीच्या मा. उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे पुढे म्हणाल्या की, ज्योतिबा व सावित्रीबाई यामुळे खर्या अर्थाने आजचा दिवस आपण साजरा करत आहोत असे सांगून त्यांच्या स्मृतींना वंदन केले. खर्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा हेतू सांगून. वाढत चाललेल्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आपल्या सर्वांसाठी किती घातक आहे हे सांगितले. आपण आपल्या जबाबदार्या पार पाडल्या पाहिजेत. स्त्रि हि कुटुंबाचा पाया आहे आणि तिच्याभोवती संपूर्ण कुटुंब फिरत असतं त्यामुळे तिचा सन्मान हा झालाच पाहिजे, असे शैलाताई उफाडे यांनी सांगितले. प्रारंभी वणी केंद्रातील महिला शिक्षिकांनी स्वागतगीत सादर केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यांच्या हस्ते 51 महिलांना साडी,ङ्गङ्गसन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रातील आदर्श शिक्षकांचाही सत्कार झाला. यानंतर विविध स्पर्धा झाल्या. स्पर्धांतील यशस्वी महिलांना गौरविण्यात आले. तसेच विविध गाण्यांवर महिलांनी नृत्य सादर केली. यावेळी उपस्थित मानवरांनी महिलांचा सन्मान सोहळा घडवून आणल्याबद्दल केंद्रप्रमुख किसन पवार यांचा गौरव केला. सुत्रसंचालन पल्लवी चौधरी यांनी केले तर आभार सुलोचना पवार यांनी मानले.