maharashtratribalnews

आज पेठला होळी यात्रोत्सव

कोहोर | किसन ठाकरे 
     पेठ तालुक्यात आदिवासी बांधवाची दिवाळी म्हणजे होळीचा सण. तालुक्यात हा सण आदिवासी बांधव गाव, पाडा, वस्तीवर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यामुळे तालुक्यात तोंडवळ नजीक पेठ नगरपंचायतने (दि. १३)होळी निमित्त यात्रेचे आयोजन केले आहे.
     या यात्रेत आदिवासी बांधव होळी सणाचा बाजारहाट करण्यासाठी हजारोच्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. यात अनेक छोट्या – मोठ्या उद्योगांना यातून तारले जात असून लोककलाही टिकवली जात आहे. यात्रोत्सवात अनेक लहान -मोठे पाळणे, तमाशे , तसेच इत्तर करमणूक कार्यक्रम, हॉटेल, खेळणी दुकाने, आईसक्रीम पार्लर आदी. व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक यात्रेत उलाढाल होत असते. त्यामुळे या यात्रेत हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने, अनेक छोटे-मोठे व्यावसायिक यात्रेत येत असतात. 
       पेठ, दिंडोरी तालुक्यासह, महाराष्ट्र – गुजरात सरहद्दीवरील अनेक गावातील नागरिक होळी सणानिमित्त यात्रोत्सवाला येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने