महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वांगणसुळे डोंगरावर आग एक ते दोन एकर वरील वनसंपदेचे नुकसान

संपादक l कृष्णा पवार
  सुरगाणा तालुक्यातील वांगण डोंगरावर बुधवार रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली.या आगीत हजारो वनजीवांनचा जीव गमावा लागला.यावेळी बा-हे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर यांना घटना समजताच अलका भोये यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तात्काळ याची दखल घेत,वन मजूर वनपालाना घटनास्थळी पाठवले वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकाऱ्यांनी आगविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जवळपास दोन एकर मध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजार रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. वांगण डोंगरावर सायंकाळी चारच्या दरम्यान ही आग लागली. यावेळी बाफळून येथील शेतकरी अमृता चौधरी, मधुकर चौधरी,रमेश चौधरी, पंडित चौधरी, युवराज चौधरी, तुकाराम चौधरी, शुभम चौधरी,संतोष वाघमारे यांनी वांगण शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विझवण्याचे प्रयत्न केले.उन्हाचा झळा असल्याने झाडांचा फांद्या अथवा बाबूंची एकमेकांशी घर्षणाने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या डोंगरावर दुर्मिळ वन औषधींचा खजिना असून ससे,बिबट्या, मोर,रानडुकर, माकडे ,रानमांजर, खवले मांजर ,घोरपड,साईंदर ,अजगर ,नागअशा वनजीवांचा अधिवास आहे.आगीमुळे या वन्यजीवांचे अस्तित्वात धोक्यात आले आहे. डोंगरावर पशुपक्षी सरपटणारे प्राणी आढळतात. वनौषधी म्हणून वापरत असलेले गवती चहा, रोयचा जळून खाक झाले.
फोटो - वांगण शिवारातील डोंगरावर लागलेली आग

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने