दिंडोरी तालुक्यातील जानोरी गाव हे एक कुंभमेळ्याचे धार्मिक गाव म्हणून ओळखले जाते येथे मोठ्या प्रमाणात मंदिरे असुन ती पुरातन झाली आहे त्यापैकी एक असलेलं कृष्ण मंदिर एक पुरातन मंदिर होते त्याच्या पूजा आरती देखभालीचे काम हे गावातील लोक बघत होते परंतु ते अत्यंत पुरातन असुन त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी शिंपी समाजातील काही लोकांनी योगेश तिडके यांच्याकडे मागणी केली होती त्यासाठी तिडके यांनी तत्कालीन पर्यटण मंत्री मा गिरीश महाजन साहेब यांच्याशी या मंदिराच्या सभामंडप बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यासाठी 40 लक्ष रु मंजूर झाले असुन कामाची वर्क ऑर्डर झाली आहे आज त्या कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे यांच्या उपस्थित पार पडला जानोरी गावच्या ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबदल योगेश तिडके यांचे विशेष आभार मानले या कार्यकर्मासाठी जानोरी गावातील मान्यवर निवृत्ती काठे दशरथ विधाते दामू नाना तिडके बाळासाहेब विधाते यादव विधाते ग्रामपंचायत सदस्य गणेश विधाते गणेश तिडके सोपान राहणे राजू राहणे योगेश राहणे राजू राहणे संकेत राहणे सगळे मान्यवर उपस्थित होते
जानोरी येथे कृष्ण मंदिर सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0