ननाशी/ओझे |-दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेचे माझ्यावर अतोनात प्रेम असून या भागतील जनतेचा सर्वांगीन विकास करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो त्यामुळे आगामी काळात या भागात विविध विकासकामे करून येथील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.चिकाडी येथे परिसरातील ग्रामस्थाच्या वतीने ना.झिरवाळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ना.झिरवाळ बोलत होते.
ना.झिरवाळ पुढे म्हणाले की,माझी राजकीय जीवनाची सुरुवात पश्चिम भागातूनच झाली असून येथील जनतेशी कायम जिव्हाळायचे नाते आहे.आता पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत येथील जनतेने कायम भरभरून प्रेम दिले आहे.त्यामुळे आता मंत्री पद मिळाल्यामुळे या परिसराचा आणि गोरगरीब जनतेचा सर्वांगीन विकास साधण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील इतर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान यावेळी ना.नरहरी झिरवाळ यांनी गांडोळे येथे आश्रमशाळा इमारत,ग्रा.पं.कार्यालय,सांस्कृतिक भवन,चिकाडी दत्त मंदिर येथे सरक्षण भिंत,पेव्हर ब्लॉक,सभामंडप,सिमेंट रस्ता आदी विकास कामांचे भूमी पूजन करण्यात आले.तसेच गांडोळे ते टेंटमाळ या रस्त्याचे उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले.
तसेच यावेळी पेठ तालुका पोलीस पाटील
संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव तुंगार,पोलीस पाटील हर्षदा भोये,निवृत्ती गवळी,जयराम भोये,हनुमंत माळगावे आदिनी ना.झिरवाळ यांचा सत्कार करून पोलीस पाटलांच्या विविध समस्याबाबत चर्चा केली.यावेळी गांडोळेचे माजी सरपंच सुरेश भोये,विद्यमान सरपंच भारत भोये,देहरेच्या सरपंच मंगल गवळी,मोखनळचे सरपंच सुधाकर जोपळे,बा.पाडाचे सरपंच सुदामरावं पवार यांचेसह परिसरातील सरपंच उप सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट - आदिवासी बांधवांच्या वतीने आदिवासी हृदय सम्राट पदवी बहाल.
ना.नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी समाजबांधवाच्या अनेक न्याय्य हक्कासाठी सत्तेत असताना आणि नसतांना सुद्धा लढा दिला आहे.त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्राल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते,तसेच आदिवासी विद्यार्थ्यांची पेसा अंतर्गत नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लावत पेसा भरती सुरु केली.आजघडीला ना.झिरवाळ राज्य पातळीवर सर्व आदिवासी समाजाचे नेतृत्व करत आहेत.त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवानी ना.नरहरी झिरवाळ यांना आदिवासी हृदयसम्राट पदवी बहाल केली आहे.