मॅथ्स ऑलिम्पियाड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्याद्वारे आयोजित गणित विषयाच्या परीक्षेत एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक, संचलित एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे, येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते दहावी या वर्गांमधील एकूण 253 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, या परीक्षेत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात शिवम सागर,आरोही बागुल,आदिती निकम, देवश्री मोरे,कार्तिक मोरे, अन्वी चंदन, दिव्या कापसे,मयंक गांगुर्डे,आस्था सोनवणे, प्रत्युष बागुल,देवांश पगार,अनया पगार व इतर 29 विद्यार्थ्यांना गोल्ड, वीस विद्यार्थ्यांना सिल्वर, 24 विद्यार्थ्यांना ब्राझ पदक व इतर विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख माणिक शिंदे, शिक्षिका रूपाली पवार, माधुरी दराडे, प्रियंका जावडा,प्रियंका पाटणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे विद्यालयाचे अध्यक्ष संजय देवरे,सेक्रेटरी मीना देवरे, प्राचार्य पाटील एस.एन. तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मॅथस् ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0