संपादक l कृष्णा पवार
माळेगाव l दि.17 प्रतिनीधी
पेठ तालुक्यातील रुइपेठा येथे सरार्सपणे अवैध दारु विक्री असून यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत चालले आहे. स्थानिक महिलांनी शोध मोहीम राबवून काही प्रमाणात दारु बाटल्या शोधल्यामुळे दारू विक्रेत्याकडून जीवे मारण्याची महिलांना धमकी दिली. यावेळी महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठत त्वरीत दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
करंजाळी परिसरातील आणि विविध गावातील महिलांनी दारूबंदीसाठी वेळोवेळी तक्रारी अर्ज करुनही दारु विक्रेत्यांवर आळा बसत नसल्यामुळे महिलांनी आपला संसार उध्दवस्त होऊ नये म्हणून घेतली कडक भुमिका घेतली. तांदळाचीबारी परिसरात लहु दाबल यांनी देशी दारू आणली असता स्थानिक महिलांनी शोध मोहीम राबवून काही प्रमाणात दारु बाटल्या शोधल्यामुळे दारू विक्रेत्याकडून जीवे मारण्याची महिलांना धमकी दिल्यामुळे भविष्यात असे खुन सारखे प्रकार घडु नये म्हणून महिलांनी पेठ पोलीस ठाणे गाठले. जिवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सुगंदा भोये, सुमन फसाळे, रोहिणी भोये, कुसुम भिवसन, कविता जाधव, पुष्पा पालवी, इंदिरा चौधरी, निर्मला भिवसन, पींटी जाधव, रंजना भोये, हिरा जाधव, ममता भोये, भास्कर भिवसन, सरपंच विनायक भोये आदी उपस्थित होते.