महाराष्ट्र ट्रायबल न्युज

के आर टी हाय स्कूल वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वि वा शिरवाडकर पुण्यतिथी साजरी

वणी वार्ताहार :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कवी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एन कोतवाल होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री साक्षरतेमध्ये दिलेले योगदान स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजाकडून भोगाव्या लागणाऱ्या यातना आपल्याला कायमस्वरूपी आठवतात. स्त्रियांच्या उद्धारासाठी असा निस्सिम त्याग करणा-या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण स्मरणात ठेवावे .कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी दिलेले योगदान आपल्याला विसरता येणार नाही असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एन कोतवाल यांनी अध्यक्ष स्थानावरून केले. यावेळी शिक्षक मनोगत एच पी गवळी यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड एम ए पोटिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने