वलखेड । वार्ताहर
मविप्र संचलित खेडगाव येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल मानसशास्त्रावर समुपदेशनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्त्या श्रीमती अरमीन श्रॉफ होत्या. अध्यक्षस्थानी जयराम डोखळे होते. यावेळी अरमीन श्रॉफ यांनी अनुकूल पालकत्व-वेळेनुसार बदल बालमानशास्त्र - अडथळे आणि उपाय मुलांना समजून घेताना पालक, शिक्षक आणि समाज करियर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेच्या युगात इंग्रजी विषयाचे महत्व आणि शाळेचे महत्व याबाबत व्याख्यानाव्दारे माहिती दिली. यावेळी े शिक्षणाधिकारी के. एस. शिंदे यांनी मविप्र संस्था आणि कर्मवीरांबद्दल सखोल माहिती देऊन इंग्लिश मिडीयम आणि होरायझन शाळाविषयी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. जयराम डोखळेंनी पालकांना जास्तीत जास्त संख्येने संस्थेचा प्रसार करून संस्थेशी एकरूप होऊन काम करण्याचे आवाहन केले. राजेंद्र ढोकरे यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेतील सर्व शाळांमध्ये असे उपक्रम घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बाबुराव डोखळे, राजेंद्र ढोकरे, सोमनाथ ठुबे, गौरव पवार, अक्षय पाटील, शरद शिरसाठ, सुनील दवंगे, विलास बस्ते, सर्जेराव तुपे, सचिन उगले आदी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक सचिन शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एल एस. बार्हाते, करण भोई, एस. बी. मवाळ, डी. बी. शेळके, ए. बी. शहा, एस. एस. दवंगे, व्ही. एस. कोरडे, डी. बी. कुशारे, ए. व्ही. बाविस्कर, डी. ए. ठुबे, के. डी. गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.