मोहाडी ता.14 : येथील प्राचीन अहिल्यादेवी होळकर बारवाजवळील श्री मोहेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात रविवार (ता. 16)पासून श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरु होत असून, हा सप्ताह 22 मार्चपर्यंत असेल. शिवकथाकार विजय महाराज आर्दड,साहित्यिक बीड यांच्या वाणीतून रोज सायंकाळी पाच ते रात्री आठदरम्यान कथा होणार आहे.यात शिव महात्म्य कथा आणि चांचुला उपाख्यान, शिवलिंग उत्पत्ती कथा, रुद्राक्ष भस्म कथा, विश्वमोहिनी कथा,यज्ञदत्त उपाख्यान, सती उपाख्यान, शिव पार्वती विवाह कथा, शिव अवतार कथा, बाणासूर कथा, कार्तिक स्वामी -गणेश जन्म कथा, महाशिवरात्री व्रत कथा अश्या विविध कथांच निरूपण करणार आहे.कथा कालावधीत सुभाष महाराज बीडकर तबला वादन, साहेबराव महाराज कवडेकर, आळंदी हे सिंथ वादन तर साईनाथ महाराज नांदेडकर हे गायन साथ करणार आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री मोहेश्वर महादेव मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
मोहाडी येथे उद्यापासून शिवमहापुराण कथा
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0