महाराष्ट्र ट्रायबल न्युज

श्री स्वामी समर्थ मोहाडीत होळी उत्साहात

मोहाडी ता. 14 : येथील शिंपी गल्लीतील संत नामदेव मित्र मंडळातर्फे मारुती मंदिरासमोर गुरुवारी (ता. 13) पारंपरिक पद्धतीने होळी साजरी झाली. प्रथेप्रमाणे ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज मंदिरासमोरील गोवऱ्यांची होळी पेटवण्यात आली. त्यानंतर येथील विविध मंदिरे व घरासमोरील होळी पेटवण्यात आल्या. होळीसाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने पाच गोवऱ्या दिल्या होत्या. लहान मुलांनी 'पाच गोवऱ्या होळीला 'अशी घोषणा देत गावातून गोवऱ्या गोळा केल्या. गोवऱ्यासोबतच 5 ते 6 फूट उंच शंखाकृती होळी रचून वस्र परिधान करीत हारकडे लावण्यात आले. सायंकाळी 7:45 वाजता विधिवत पूजन करून होळी प्रज्वलीत करण्यात आली. सुवासिनींनी पूजन करून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.होळीचा सण भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा सण आहे.या दिवसापासून थंडी कमी होऊन ऊन वाढते. अंधारातून प्रकाशकडे,अज्ञानातून ज्ञानाकडे,अंधश्रध्येकडू श्रध्येकडे असा या होळीचा मुख्य उद्देश आहे.कुणाला डिंगोरे, प्रतिक डिंगोरे, रुद्र बोढाई, संस्कार डिंगोरे, सार्थक डिंगोरे,श्रेयस डिंगोरे,अभिषेक देशमुख,मंगेश डिंगोरे, प्रिन्स डिंगोरे, प्रसन्ना डिंगोरे,यांनी परिश्रम घेतले.
मोहाडी : मंडळातर्फे होळी पूजन करताना सदस्य.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने