मुख्य संपादक l मनोज पाटील संपादक l कृष्णा पवार
सुरगाणा व पेठ तालुक्यातील शेतमजुर होळी उत्सव साजरा करण्यासाठी मुळ गावी गेल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतीकामाचा वेग मंदावला आहे दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने सुरगाणा व पेठ तालुक्यातील आदिवासी बांधव शेतमजुरी साठी येतात बहुतांशी आदिवासी बांधवांचे कुटुंबिय या कामासाठी महिना न महिना शेतमाल कांकड़े वास्तव्य करतात मजुरी करून उदरनिर्वाह करणे तसेच चार पैसे गाठीला बांधुन संसाराचा गाड़ा हाक ण्या कड़े त्यांचा अग्रक्रम असतो शेतीकामा चे सखोल ज्ञान व कष्ट करण्याच्या तयारीमुळे त्या भागातील मजुरांना विशेष मागणी असते अंगावर पैसे देणे लग्न कार्य दवाखाना अशा तत्सम खर्चाचे नियोजन आपत कालीन परिस्थितित करण्याची भुमिका शेतमाल कांची असते त्यामुळे शेतमजुर व शेतमालक असे संबंध न राहता विश्वासाचे घट्ट नाते तयार होते प्रामाणिकपणा व अंगावर घेतलेले काम पूर्ण करण्या च्या मनोवृतीमुळे एकमेकांवर विश्वास टिकुन राहतों दरम्यान होळी उत्सवाची लगबग जेव्हा सुरू होते तेव्हा त्या मजुरांना वेद लागतात ते मुळ गावी परतण्याचे कारण होळी उत्सवाचे अनन्य साधारण महत्व आदिवासी बांधवांच्या मनात आहे पिढ्यानपिढया कुटुंबियासमवेत हा सण साजरा करण्याची परंपरा आहें तसेच होळीपासुन सुरगाणा व पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप याला येते उत्सव साजरा करताना धार्मिक भावनेचा स्पर्श असल्यामुळे आदिवासी बांध व
हा सण मुक्तमनाने साजरा करतात पूजाविधी नैवेद्य, गोड धोड़ पदार्थ आवर्जुन तयार केले जातात नविन कपड़े भ्रमणध्वनी पादत्राणे गॉगल्स खरेदी करण्याकड़े कल असतो दरम्यान हे सर्व करण्यासाठी अनेक दिवसंपासुन तयारी करणारा आदिवासी शेतमजुर आवर्जुन मुळ गावी जाण्या करिता उत्सुक असतो अशावेळी शेतमाल कही भावना समजुन परवानगी देतात व सण साजरा करण्यासाठी पैसेही अंगावर देण्याची तयारी ठेवतात दरम्यान शेतीबरोबर काही व्यावसायीक प्रतिष्ठनामधेही सुरगाणा व पेठ तालुक्यातील आदिवासी बांधव काम करतात काही वाहन चालक म्हणुनही काम करतात मात्र होळी हा सण चार ते पाच दिवस मोकळेपणाने साजरा करण्यासाठी आदिवासी बांधव मुळगावी परतल्याने या नमुद सर्व घटकांच्या कामकाजा चा वेग मंदावला आहे