निवाने : वसंत आहेर(वार्ताहर )-
कळवण -निवाने गावचे आराध्य दैवत श्री विठोबा महाराज यात्रा उत्सवाला सोमवार दिनांक 10/3/2025 पासून सकाळी 8 वाजता मांडव मिरवणुकीने सुरवात झाली असून असून सायंकाळी 5 वाजता निवाने गावाचे वेदशास्त्र सम्पन्न पुरोहित मनोज चंद्रात्रे यांच्या मंत्र घोषात व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा करून ढोल ताशांच्या गजरात रथाची मिरवणूक काढण्यात आली तर रात्री 9 वाजता ह भ प वैष्णवी ताई यांचा कीर्तनाचा धार्मिक कार्यकम आयोजित केला गेला..मंगळवार दिनांक 11/3/2025 रोजी पुरोहित मनोज चंद्रात्रे यांच्या हस्ते अभिषेश पूजा तर रात्री 9 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून शाहीर बारकू पिंजारी यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला असून बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी यात्रा व कुस्त्यांची दंगल तसेच बैलगाडा शर्यत बाबत सोशल मीडियावर कळवण्यात येईल अशी माहिती यात्रा कमिटी चे अधक्ष्य घनश्याम पाटील यांनी दिली .....****निवाने व परिसरातील लोकांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठलाचे मंदिर अतिशय देखने व सुसज्य असून गेल्या 16 वर्षांपूर्वी मोडकळीस आलेल्या मंदिराच्या जागेवर ग्रामस्थांच्या सहकार्यातून नवीन व देखने मंदिराची निर्मित्ती करण्यात येऊन नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अगदी उत्सहात संपन्न झाला होता तेव्हापासून ते आजतागायत मंदिरात नेहमी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.......अशा निवाने व पंचक्रोशीतील नागरिकाचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठोबा महाराज यात्रेस प्रारंभ झाला असून श्री विठ्ठलाच्या यात्रेचा व दर्शनाचा निवाने परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा व यात्रा उत्सव उत्साहात पार पाडणेसाठी कमेटीस सहकार्य असे आवाहन अध्यक्ष घनश्याम पाटील,उपाध्यक्ष शशिकांत आहेर, खजिनदार देविदास आहेर, सचिव संजय देवरे पोलीस पाटील दादा खरे सह सदस्य दिलीप आहेर, छगन आहेर,रोहन आहेर, संदीप आहेर, ललित आहेर, गणेश आहेर, रोशन आहेर, ऋषी सोनवणे,महेश आहेर, भाऊसाहेब आहेर, किरण पगार,किरण आहेर, सचिन आहेर, कैलास आहेर, प्रवीण थोरात, किरण निरभवणे सह येथील जेष्ठ नागरिक,सर्व परिसरातील तरुण मित्र मंडळ व यात्रा कमिटी यांनी केले आहे