महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा येथील १०८ अंबुलन्स तालुक्यातील गाळपाडा येथे नादुरुस्त

प्रतिनिधी बोरगाव 
सुरगाणा येथील १०८ रुग्णवाहिका हि नाशिक येथे रुग्णांला पोहचविल्यानंतर रविवारी (दि. १६) रोजी चार वाजता सुरगाणा येथे परत येत असताना नादुरुस्त असल्याने तालुक्यातील गाळपाडा येथील सुरेश गावित यांच्या शेतात उभी आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सुरगाणा, पळसन या तीन ठिकाणी असलेल्या १०८ अंबुलन्स ची स्थिती याच प्रकारची आहे. त्याची पण परिस्थिती याच प्रकारची आहे. तालुक्यातील ग्रामस्थांनी नवीन १०८ अंबुलन्स मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुरगाणा तालुक्याला कोणी वाली आहे की नाही, असा गंभीर विषयावर रंगत सुरू आहे. मायबाप आमच्या कडे पण लक्ष द्या, अशी आदिवासी जनतेच्या अंतर हाक कोणी ऐकणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने