maharashtratribalnews

जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वनारे तालुका दिंडोरी या शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

 
संपादक: कृष्णा पवार

 दिंडोरी  तालुक्यातील वनारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती , पाली येथील गणपती दर्शन, मुरुड जंजिरा किल्ला, मुंबई येथील राजभवन गेटवे ऑफ इंडिया,नरिमन पॉईंट आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या,   राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री  नामदार नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई येथील निवासस्थान व कार्यालय सुरुची येथे भेट दिली.मुंबईतील विविध ठिकाणांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन घडवून आणण्यात आले, शालेय विद्यार्थ्यांची बस मुंबईमध्ये दाखल होताच वनारे गावचे सरपंच  दिपक झिरवाळ.मंत्री नरहरी झिरवाळ  यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हिरामण झिरवाळ, हरीष चौधरी,  अनिल भोये,यांनी विद्यार्थ्यांसोबत बस मध्ये प्रवास करून विद्यार्थ्यांशी हितगुज साधत मुंबई शहराची माहिती दिली,  नरहरी झिरवाळ  यांच्या कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना 47 एकर मध्ये वसलेल्या राजभवनाची सफर करण्यात आली. राजभवन येथे दरबार हॉलमध्ये बसून राजभवनाची माहिती आणि राजभवनाच्या बँक्वेट हॉलमध्ये चहा बिस्किट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.  संपूर्ण राजभवनाचे विद्यार्थ्यांना दर्शन घडवून आणले. तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे सर्व विद्यार्थ्यांची  नरहरी झिरवाळ  यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांची हितगुज केले.आपल्या गावातीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन जनसामान्य माणसांची सेवा करत गावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारल्याने विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप आनंद होत असल्याचे बोलून दाखवले. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन घडवून आणल्याबद्दल  संदिप चौधरी.दिनेश सहारे,श्रीमती गिताबाई गावित या शिक्षकांचे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गांचे झिरवाळांनी  कौतुक केले व पुन्हा मुंबईला येण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने