वलखेड प्रतिनिधी | तालुका दिंडोरी येथे तिथीप्रमाणे दि.१७ रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबाद प्रमाणे होणाऱ्या शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास सर्वपक्षीय नागरिकांनी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांनी केले आहे.