महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दारू विक्रेत्याची गळ्यात दारूच्या बाटल्या घालून मिरवणूक

नळवाडपाडा येथील महिला आक्रमक
मुख्य संपादक: मनोज पाटील
दारूची उभी बाटली आडवी करण्यासाठी थेट दारू विक्रेता श्रीधर सिताराम गवळीच्या गळ्यात दारूच्या बाटल्याची माळ घालत दारू बंदीचा एल्गार नळवाडपाडा ता.दिंडोरी येथील महिलांनी केला आहे. 
दारूबंदीसाठी आक्रमक झाल्या होत्या, गावात दारू विक्रीचे मोठे गबाड निर्माण झाले असून याबाबत दिंडोरी पोलीस ठाणे यांनी विनापरवाना दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी हि मागणी करण्यात आली होती. दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीकडून महिलावर्गावर मोठे घातकी परिणाम होत आहे, तरुण पिढी हि दारू च्या मोट्या प्रमाणात आहारी गेली असून गांजा सारखे विघातक पदार्थ सेवन करताना दिसत आहे, घरातील पुरुष वर्ग आपल्या घरातील महिलेला मारहाण ,शिवीगाळ असे प्रकार घडत आहे त्यामुळे नळवाडपाडा गावातील दारू विक्री बंद व्हावी अशी मागणी महिला वर्गाने केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा हे गाव दिंडोरी तालुक्यातील महत्त्वगणिक गाव असून या गावात सर्रास पणे दारू विक्री चालू असते मात्र या दारू विक्रेत्यांना कुणाचे पाठबळ लाभले आहे या बाबत येथील महिला वर्गाना प्रश्न पडला असून गावात काही दिवसापूर्वी दारू बंदी करावी याबाबत दारू विक्रेत्यांना बजाविले होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसून अखेर गावातील महिलांनि आक्रमक होत थेट दारू विक्रेता श्रीधर सिताराम गवळी यास पकडून ग्रामपंचायत कार्यालय येथे नेत दारूच्या बाटल्याची माळ घालत मिरवणूक काढली,व त्यास दिंडोरी पोलीस याच्या हवाली करीत त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंदविला गेला असून गावात दारू बंदी विषयी दिंडोरी पोलीस ठाणे कडून मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली असून सादर आरोपीस दिंडोरी पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार जाधव यांनी ताब्यात घेतले होते.

चौकट-
*दारू विक्री वर लगाम लावा* 
दिंडोरी तालुक्यात दारू विक्रीचे वारे अधिक प्रमाणात दिसून येत आहे मात्र त्यावर कोणत्याच प्रकारे अंकुश लावला जात नसून हि मोठी शोकांतिका च मानावी लागणार असून याबाबत संबंधितांनी कडक कारवाई करणे गरजेचे ठरत असून दारू विक्रीचा मोठा फटका महिलांना सोसावा लागत असून रात्री अपरात्री पुरुष मंडळी महिलांना शिवीगाळ मारहाण असे प्रकार घडवून आणत असून पोलीस प्रशासनाने यावर कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा सह ठेपणपाडा येथे हि दारू विक्रीचा खेळ रंगत असून यावर लगाम लावणे महत्वाचे आहे.

प्रतिक्रिया:
दारू विक्रीचे प्रमाण सध्या मोट्या प्रमाणात वाढले असून याचा परिणाम महिलावर्गावर होत आहे,गावातील दारू विक्री बाबत योग्य निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या सहमतीने निर्णय घेतला जाणार आहे,सदर गावातील दारू विक्री करणारा हा दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिला असून यापुढे दारू विक्री बाबत कठोर भूमिका घेतली जाणार आहे.

 हिरामण गावित नळवाडपाडा सरपंच

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने