maharashtratribalnews

जिल्हा विभागीय वन अधिकाऱ्यांची मोहाडी देवराई सदस्यांनी घेतली भेट

संपादक l कृष्णा पवार 
दिंडोरी ता. ११: मोहाडी सह्याद्री देवराईच्या पुढील वाटचालीसाठी शासनाच्या वतीने मदत व मार्गदर्शनासाठी नाशिक जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे यांची नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात देवराई सदस्यांनी भेट घेतली. यावेळी देवराई सदस्यांनी श्री.रणदिवे यांना देवराईची आजपर्यंतची वाटचाल, वृक्ष संगोपनाविषयी लोकजागृती व लोक सहभाग, दुर्मिळ वृक्षांचे संगोपन, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे सहकार्य तसेच यापुढील काळासाठी चा देवराईच्या विकासाचा आराखडा, त्यात विशेषत्वाने बोटॅनिकल गार्डन,सायकलींग ट्रॅक, मेडिटेशन हॉल, तलावाचे सुशोभीकरण, ट्री म्युझियम,प्रत्येक झाडाला माहितीचा बारकोड अशा अनेक बाबींविषयी नियोजित आराखडा दाखवून सविस्तर माहिती दिली.
यावर श्री.रणदिवे यांनी देवराई सदस्यांना अनेक प्रश्न विचारून अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊन या लोकोपयोगी उपक्रमात सातत्य ठेवल्याबद्दल मोहाडी ग्रामस्थांचे कौतुक करून देवराई विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून शासकीय व वैयक्तिक पातळीवर पूर्ण सहकार्य करून मोहाडी देवराईला लवकरच भेट देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी देवराई सदस्यांसोबत वन विभागाच्या कर्मचारी श्रीमती लटके या उपस्थित होत्या.

नाशिक: विभागीय वनाधिकारी श्री.रणदिवे यांना रोपटे भेट देताना देवराई सदस्य.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने