प्रतिनिधी l बोरगाव
दि.१०/०३/२०२५ रोजी वार सोमवार या दिवशी दुध महा संघाचे संचालक, व भावी जि.प. सदस्य श्री तुकाराम देशमुख म्हैसखडक तसेच, तालुका काँग्रेस कमिटी सुरगाणा शहराध्यक्ष श्री चंद्रकांत (भाऊ पाटील) भोये, काँग्रेस कार्यकर्ते वसंत बागुल वांजुळपाडा, परसराम शेवरे म्हैसखडक, सावळीराम महाले कुकूडणे, नामदेव सहारे रगतविहीर आदी, यांनी मा. महसुलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन रोजच ४० हजार लिटर दूधाचे उत्पन्न घेत असलेल्या महिला दुध संघा विषयी चर्चा करण्यात आली, रोजगार अभावी होणारे स्थलांतर, दूध उत्पादक संघातर्फे नक्कीच कमी होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. जर तालुक्यातील धवलक्रांती यशस्वी राबवायची असेल तर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलध करून देले तर निश्चितच तालुक्यातील स्थलांतर थांबू शकते असा विश्वास तुकाराम देशमुख यांनी केली.