सुरगाणा - कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण येथे दिनांक 15 मार्च 2025 रोजी ग्राहक संरक्षण कायद्याने दिलेल्या ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाअंतर्गत जागतिक ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. कोणत्याही वस्तू आणि सेवांच्या मार्केटिंग पासून संरक्षण मिळण्याचा ग्राहकांचा हक्क आहे जे ग्राहकाच्या हिताचे आहे. ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तू बद्दल माहिती मिळण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर वस्तूची व सेवेची गुणवत्ता, प्रमाण, सामर्थ्य, शुद्धता, मानक आणि किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून हा दिवस केवळ ग्राहक संरक्षणात झालेल्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्याचा नाही तर सध्याच्या आव्हानांना मान्यता देण्याचा आणि सर्वांसाठी अधिक न्याय आणि समतापूर्ण बाजारपेठ निर्माण करण्याच्या आपल्या वचन पद्धतीचे नूतनीकरण करण्याचा आहे असे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.हेमलता महाले यांनी सांगितले. आजच्या जागतिक बाजारपेठेत ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त जोडलेले आहेत.भौगोलिक सीमा ओलांडून विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत आहेत. यामुळे विक्रेते आणि ग्राहक यांचे परस्पर संबंध चिंता निर्माण करतात. न्याय्य वागणूक, धोक्यापासून सुरक्षितता बाळगण्यासाठी आपण ग्राहकांचे हक्क आणि न्याय वागणूक सुनिश्चित करणारे मूलभूत तत्वे समजून घेतले पाहिजेत असे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर यांनी आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील
प्रा. किशोर काळे, प्रा. मधुकर गावित, प्रा. सुभाष पवार, प्रा. तुळशीराम चौधरी, प्रा. मंदिप राऊत, प्रा. ज्योती येवले, प्रा. उमाताई देशमुख, प्रा. कलावती थविल , शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल कदम, अनिल ठाकरे, हिरामण गावित, यशोदा गावित आणि विद्यार्थी उपस्थित होते.