महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बुध्दगया, महाबोधी, महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा

दिंडोरी । मुख्य संपादक- मनोज पाटील 
बुध्दगया महाबोधी, महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देणे व त्या आंदोलनात बसलेल्या भिखु संघाच्या उपोषनाला मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन अतिरीक्त बळाचा वापर केल्याने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत दिंडोरी तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसिलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाबोधी महाविहार बिहार राज्यातील बोधगया (बुध्दगया) हे संपुर्ण जगातील बौध्द अथवा बुध्दांची विचारधारा माननार्‍यांसाठी अतिशय पवित्र स्थळ आहे. याच ठिकाणी राज पुत्र सिध्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांनी ज्ञान प्राप्ती होऊन बुध्दत्व प्राप्त झाले. त्याचप्रमाणे इ.पुर्व 260 मध्ये सम्राट राजा अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या 11 व्या वर्षी तेथे येऊन बोधीवृक्षाला वंदन करुन त्या ठिकाणी सोन्याचा मोहरा देऊन बौध्दविहार बांधुन घेतले. म्हणुन राजा सम्राट अशोकाला महाबोधी महाविहाराचे संस्थापक म्हटले जाते. जगातील बौध्दांचे हे श्रध्दास्थान आहे. लाखो अनुयायी येथे येऊन बुध्दांच्या विचारधारेचे अनुसरन करता. असे हे महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी सुरु असलेल्या पुज्य भिख्खु संघाच्या उपोषन व आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलन मोडित काढण्यासाठी स्थानिक पोलिसांकडुन अतिरीक्त बळाचा वापर केल्याने त्याचा जाहीर निषेध नोंदविला. बोधगया महाबोधी महाविहारच संपुर्ण प्रशासन व्यवस्थापन बौध्दांकडेच व बौध्द भिख्खूंकडे द्यावे, बोधगया मंदिर कायदा 1949 त्वरीत रद्द करावा, बौध्द संस्कृतीचे पुर्नस्थापन आणि बौध्द स्थळांचे संरक्षण करावे, प्रत्येक धार्मिक समुदयाला त्यांच्या पवित्र स्थळांचे प्रशासन करण्याचा अधिकार मिळावा, बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात उपोषनाला बसलेल्या धम्मगुरु सर्व भिख्खु संघ यांच्या आंदोलनातील सर्व मांगण्या पुर्ण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे. सरचिटणीस सचिन बागूल, कोषाध्यक्ष दगु सोनवणे, रिपाइं तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष अमोल निकम, हेमंत पगारे, मनोज गवारे, चंद्रकांत पगारे, बाळासाहेब लोखंडे, कैलास गायकवाड, चेतन गांगुर्डे, उमेश पगारे, सागर पगारे, गणेश गांगुर्डे. गणेश भडदिवे, सोमनाथ जाधव, सुमित गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने