निवाने l वसंत आहेर
कळवण-देवळा तालुक्यांच्या सिमेवरील निवाणे वरवंडीच्या आदिवासी भागातल्या आत्मनिर्भर दिव्यांगजन पुनर्वसन केंद्र सलग्न शिक्षण आणि संशोधन प्रकल्पाच्या बांधकामास जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पंचवीस लाखाची मदत केल्याचे पत्र नुकतेच चेअरमन उन्मेश वाघ यांच्याद्वारे संस्थेस प्राप्त झाले आहे. उन्मेश वाघ हे 2000 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी यांच्यातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अनेक सामाजिक कार्यात हातभार लागला असून समाजाच्या विविध घटकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी झटणाऱ्या संस्थाना यामुळे बळ व काम करण्याची ऊर्जा मिळत आहे.**** ज्यांचा नातू दिव्यांग आहे व दिव्यांगपन मुळे कुटुंबाला आलेल्या अडचणी व इतर समस्या समाजातिल दिव्यांग कुटुंबाना येऊ नये शारीरिक विकलांगता आयुष्याच्या वाटचालीत अडथळा ठरते काहीतरी करण्याची इच्छा असतांनाही योग्य कौशल्य व मार्गदर्शन अभावी दिव्यांग परावलंबी जीवन जगत असतात हेच परावलंबी जीवन स्वावलंबी व्हावे या उदात्त हेतूने नातूच्या प्रेमा पोटी सौ मंगला कौतिक आहेर यांनी या व्यावसायिक पुनर्वसन केंद्रात दिव्यांगाना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वतःच्या नावे असलेली तीन एकर जागा उपलब्ध करून देत सदर जागेवर दोन वर्षांपूर्वी या दिव्यांग संकुलाचे उद्घाटन जि प. सी. ई. ओ.आशिमा मित्तल यांनी करून भूदान केलेल्या मंगल आहेर यांचे अभिनंदन करून वरवंडी भागातील तीन एकर जागेत साकारणारा हा वसुंधरा संस्थेचा विशेष पुनर्वसन व शैक्षणिक प्रकल्प दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढविणारा ठरणार आहे असे जि.प. नाशिकच्या सि. ई. ओ. अशिमा मित्तल यांनी सांगून सदर संस्थेचे कौतुक केले आहे
***सदर जागेवर शिक्षण,प्रशिक्षण देत त्यांच्या आरोग्यात सुधारणा करून विविध सुविधांसह त्यांना आत्म निर्भर बनवण्यासाठी या केंद्राची मुहर्तमेढ झाली आहे असे डॉ दिपक आहेर यांनी सांगितले जेएनपीएचे चेअरमन उन्मेषजी वाघसर,व्यवस्थापक मनीषा जाधव, सुबोध आव्हाड,सल्लागार सिद्धार्थजी या मान्यवरांनी
आत्मनिर्भर दिव्यांगजन पुनर्वसन केंद्र सलग्न शिक्षण दिव्यांगांच्या या शैक्षणिक व आरोग्य प्रकल्पास केलेल्या मदतीसाठी दिव्यांगजनांसाठी कार्य करणाऱ्या आत्मनिर्भर केंद्राचे महेंद्र पाटील, प्रभाकर आहेर,डॉ.दीपक आहेर,राहुल,दुसाने,सचिन निकम, डॉ.कदम आदींनी त्यांचे आभार मानले.