महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अभोणा येथे कांदा खरेदीचा शुभारंभ

संपादक l कृष्णा पवार 
कनाशी : अभोणा येथील ए.टी.पवार कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोमवारपासून (दि.१७) उन्हाळी कांदा लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ झाला. मुहूर्ताच्या बैलगाडीस ३२०५ रुपये इतका भाव मिळाला. पहिल्या दिवशी एकूण २०६ वाहनांचा लिलाव करण्यात आला. कांद्यास किमान ७६० रु. तर कमाल १६५० रु. इतका भाव मिळाला. यावेळी विक्री केलेल्या मालाचे पैसे रोख स्वरूपात घेण्याचे आवाहन सभापती धनंजय पवार यांनी शेतकऱ्यांना केले तर, शेतकऱ्यांनी विक्रीस माल आणताना योग्य प्रतवारी करून आणावा जेणे करून शेतमालास जास्तीत जास्त भाव देता येईल अशी भावना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश निकम यांनी व्यक्त केली. यावेळी बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, व्यापारी संचालक योगेश महाजन, संचालक बाळासाहेब वराडे, सोमनाथ पवार, व्यापारी गणेश निकम, युवराज पवार, मनोहर पवार, जाकीर शहा, मोहन सूर्यवंशी, शिवा निकम, विकी पाटील, वसंत निकम, विकी जाधव, बिपिन शिंदे, अनिल अहिरराव, मोहित जाधव, निलेश पाटील, जीवन ठाकरे, आतिश बोराडे, हेमंत मोरे, भूषण आहेर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने