महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वायघोळ धरण येथे पाट दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ येथील धरण पाट (कॅनॉल) दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे.आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून सुमारे सत्तर (70) लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. कामाच्या शुभारंभप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वामन खोसकर,मिथुन राऊत,हरसूलचे सरपंच काशिनाथ वळवी, उपसरपंच आखलाक शेख उपस्थित होते.
       हरसूल भागातील जातेगाव येथील रोशनी साठवण तलाव व वायघोळी धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.यामुळे पाटाच्या पाण्यावर शेतकरी बारमाई पिके घेत आहेत.वायघोळ धरण पाट दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हरसूल शहरातील पाणी टंचाईचे सावट दूर होण्यास मदत होणार आहे.या पाट चारी दुरुस्तीमुळे हरसूल शहरातील कोरड्याठाक पडलेल्या कुपनलिकेला पाणी येणार असल्याचे हरसूलचे उपसरपंच आखलाक शेख यांनी सांगितले. वायघोळ धरण क्षेत्रापासून जवळपास सात किलोमीटर पर्यंत पाटाची (कॅनॉल)दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे 437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता हेमंत शार्दूल यांनी सांगितले.
           यावेळी ग्रा. पं. सदस्य नितीन लाखन,हिरामण जाधव, रितेश गुणगुणे, नितीन देवरगावकर,ज्ञानेश्वर तुंबडे, गोकुळ बत्तासे, योगेश आहेर, अनिल बोरसे, बिरजू जाधव, सुनील पारधी, सुरेश गायकवाड, पप्पू शेख, अन्वर शेख,कनिष्ठ अभियंता हेमंत शार्दूल आदिसह पदाधिकारी, ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र : हरसूल : पाट दुरुस्ती कामास सुरुवात करतांना वामन खोसकर,मिथुन राऊत,सरपंच काशिनाथ वळवी, उपसरपंच आखलाक शेख व मान्यवर.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने