maharashtratribalnews

शेतकरी व काही महिलांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले वरवंडी येथे द.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने महिला दिन साजरा


संपादक l कृष्णा पवार 
दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे महिला दिनानिमित्त दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांचेवतीने पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उप महाप्रबंधक विनोद घाटे , क्षेत्रीय प्रबंधक विनायक दीक्षित व जिल्हा प्रमुख वैभव संत , बाळासाहेब रायकर यांचे मार्गदर्शन खाली आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त वरवंडी , दिंडोरी जिल्हा नाशिक येथे पीक विमा कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यात महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहान देण्यासाठी कंपनीच्या वतीने व्यावसायिक छत्री वाटप करण्यात आले.
तसेच पीक विमा पाठशाळेचे आयोजन करून उपस्थित महिलांना पीक विमा योजने संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच गावातील काही प्रतिष्ठित
 प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत माहिती देण्यात आली तसेच द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी केलेल्या कार्याचे देखील आलेख महिलांना समजावून सांगण्यात आला या कार्यक्रमाची अधिक माहिती अमोल जाधव यांनी दिली तर यावेळेस महिलांना लकी ड्रॉ काढून भाजी विक्री असेल तसेच शेतामध्ये काम करत असताना सावलीचा व पावसापासून बचाव करण्यासाठी लकी ड्रॉ विजेत्या महिलांना ग्रामपंचायतीच्या सदस्य उपसरपंच ग्रामसेवक यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले यावेळेस उपस्थित महिलांनी द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आभार मानले व उपसरपंच राजश्री जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आज आमच्या गावांमध्ये जो उपक्रम राबवला अतिशय स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमामुळे महिलांना भाजी विक्री करण्यासाठी जो निवारा लागतो त्यासाठी छत्रीचा वापर होईल तसेच शेतामध्ये काम करताना लहान मुले असतील तसेच काम करताना महिलांना देखील ऊन लागते त्या सावलीत बसून जे काम करायचं असेल ते करता येईल त्यामुळे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांचे मी आभार मानते व पिक विमा योजना राबवत असताना द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला चांगली मदत झाली आहे आणि यापुढेही कंपनी चांगले सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करते व वरवंडी ग्रामपंचायत च्या वतीने व माझ्या वतीने मी द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आभार मानते व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे देखील आभार मानते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने