दिंडोरी – खुशिराज प्राथमिक आश्रम शाळेमध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक, चित्रकला स्पर्धा, विज्ञान नाटिका आदींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विज्ञानाबद्दलचे कुतूहल वाढवणाऱ्या विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. सपकाळे यांनी केले. तसेच, ओम मिस्तरी, हर्षल राऊत, हरी ओम गायकवाड, करण शेवरे, गौरव रानडे, गौरव लाखन, दिनकर दरोडे आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री भूषण बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी वरिष्ठ शिक्षक श्री जी. एम. पाटील, श्री दिलीप गांगुर्डे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. आर. तोरवणे, श्री शरद जाधव, श्री प्रशांत सूर्यवंशी, श्रीमती ए. एन. महाले, श्रीमती एस. के. कापुसकरी, श्री एम. एन. खातळे, श्रीमती एम. एन. देवरे, श्रीमती ए. एस. सपकाळे, श्रीमती एस. एस. दळवी, श्री एम. डी. देवरे, आश्रम शाळेचे अधीक्षक श्री जे. बी. शिंदे, श्रीमती एस. डी. पवार, श्रीमती एम. एम. हुमणे, श्री के. डी. सूर्यवंशी, श्रीमती एम. जी. सोनवणे, श्री ए. डी. जाधव, श्री एस. टी. पाटील, अश्विनी शेवरे आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयीची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला.