दिंडोरी -
दिंडोरी -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून सरकारी वकील मा.रत्नप्रभा कदम मॅडम व डॉ माधवी गोसावी यांचे सह हायस्कूलमध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला भगिनींच्या उपस्थितीत महीला दिन साजरा करण्यात आला .
याप्रसंगी अध्यापक विद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकां व प्रमुख महीला अतिथींना फेटे घालून सवाद्य कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. उपस्थित सर्व महीला भगिनींना सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉ. माधवी गोसावी यांनी महिला व आरोग्य तर सरकारी वकील मा. रत्नप्रभा कदम यांनी महिला व कायदा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय काळोगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा व कर्तुत्वाचे, कार्याचा गौरव केला तसेच अध्यापक विद्यालयातील सहकारी शिक्षिका श्रीमती प्रा. महाले अर्चना, प्रा.श्रीमती ठाकरे स्मिता, प्रा श्रीमती डॉ जगताप प्रतिमा, श्रीमती पाटील सोनाली व विद्यार्थीनी आदींंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका रूपाली बागुल हिने केले प्रास्ताविक प्रा धामणे मनोहर यांनी तर आभार प्रा.डॉ भोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कराटे भाऊसाहेब श्री लिलके सर श्री नारायण वरखेडे श्री कदम मामा श्री उकिर्डे मामा श्री गावित मामा यांनी विशेष परिश्रम घेतले .
सल्लागार - नितीन गांगुर्डे , राजेंद्र गांगुर्डे
मार्गदर्शक - विलास ढाकणे,मनोज पाटील
कार्यकारी संपादक - देविदास कामडी
संपादक - कृष्णा पवार
उपसंपादक - बापू पाटील, धर्मराज महाले देविदास गावित