दिंडोरी l मनोज पाटील :-दिंडोरी - नाशिक रस्त्यावरील दिंडोरी जवळील वनारवाडी पाटाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात 21 वर्षीय युवती ठार झाली असून वनारवाडी शिवारातील दुसरी घटना घडल्याने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .
दिंडोरी - नाशिक रस्त्यावरील वनारवाडी पाटाजवळ राजू चव्हाण यांचे शेत आहे. गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते. त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी ऊसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला. बिबट्याने तिच्या मानेला धरले तिने आरडाओरड केला. तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरल्याचे पाहताच आरडाओरड केला. त्यावेळी पायल कडे धावले त्यानंतर बिबट्याने पायलला 6-7 फूट ओढळ नेले आजूबाजूचे शेतकरी पायलचे वडील चुलते व नातेवाईक ऊसाकडे धावले बिबट्याने गलका- आवाज ऐकल्यावर पायलला तिथेत बिबट्याने सोडून पळ काढला. पायलला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यानी तपासणी केली असता मूर्त घोषित केले. यावेळी वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली. तिच्या वरती शवविच्छेदन करण्यात आले.